व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमध्ये संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी ; बंजारा समाज भवनासाठी 51 लाखाचा निधी देण्याची आमदारांची घोषणा

बंजारा सेवा संघ, मावळच्या वतीने संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 15, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sant Sewalal Jayanti celebrated with enthusiasm in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात बंजारा समाज भवन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, बंजारा बांधवानी मावळ तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी. आपण समाज भवन बांधण्यासाठी ५१ लाख रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले.

बंजारा सेवा संघ, मावळच्या वतीने संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक ते सुशीला मंगल कार्यालया दरम्यान भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मावळ तालुक्यातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भोग करण्यात आला. या मेळाव्याचे उदघाट्न उद्योजक संतोष पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता चव्हाण – राठोड, तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोगरे, युवानेते रवींद्र भेगडे, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा रतनू जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, उपाध्यक्ष चंदू राठोड, देसू राठोड, सचिव अमरजीत चव्हाण, खजिनदार राजू पवार, अभिनेते आशुतोष राठोड, मार्ग फाऊंडेशन सोलापूरचे अध्यक्ष संतोष पवार, शंकर पवार, जयराम चव्हाण, विजापूरचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रामभाऊ राठोड, देवेंद्र राठोड, विठ्ठल राठोड, शेट्टीप्रताप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

  • आमदार शेळके म्हणाले, की बंजारा समाज हा मेहनत करून जीवन जगणारा समाज आहे. आज शिक्षण घेऊन हा समाज मुख्य प्रवाहात आला आहे. अनेकजण उच्चशिक्षित असून, मोठ्या अधिकारीपदावर कार्यरत आहेत. या समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

ममता राठोड यांनी बंजारा समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाला हक्काचे व्यासपीठ समाजभवन मिळावे,अशी मागणी समाजाच्या वतीने केली. खासदार श्रीरंग बारणे, सत्येंद्रराजे दाभाडे, रवींद्र भेगडे, संतोष पवार यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक हिरा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले, तर लखन जाधव यांनी आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त


dainik maval jahirat

Previous Post

शिवली येथील 25 वर्षीय युवक बेपत्ता ; वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल । Vadgaon Maval

Next Post

वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shivam Bafna from Vadgaon Maval took Jain Bhagwati Deeksha Mahak Rishi new name

वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले 'महक ऋषी' ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.