Dainik Maval News : लोणीकंद येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ ग्रिकोरोमन अजिंक्यपद कुस्ती व पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा युवा राष्ट्रीय कुस्तीगीर पै. वैष्णव नारायण आडकर याने ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. ऑलिंपिकवीर मारुती आडकर यांच्यानंतर राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात पदक मिळविणारा मावळ तालुक्यासह शिवली गावचा दुसरा कुस्तीगीर ठरला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व ओंकार कंद युथ फाउंडेशन व प्रदिपदादा कंद युवा मंचच्या वतीने लोणीकंद, पुणे येथे वरिष्ठ ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद व पहिली ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा युवा राष्ट्रीय कुस्तीगीर पै. वैष्णव नारायण आडकर याने ७२ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धाकांवर विजयी मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
- वैष्णव याने आतापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चार पदकांची कमाई केली आहे. यामध्ये भोपाळ, मध्यप्रदेश व चेन्नई, तामिळनाडू येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णवचे सहा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे चौथे रौप्यपदक आहे. तर रांची, झारखंड व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राष्ट्रीय व राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.
वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव ॲड. पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै. तानाजी कारके, पै. भरत लिमण, पै.मनोज येवले, कार्याध्यक्ष पै. नागेश राक्षे, पै. निवृत्ती काकडे , पै. विष्णू शिरसाट, पै. धोंडिबा आडकर, पै. विश्वास वाघोले, पै. ऋषिनाथ शिंदे, पै. सुरेश आगळमे, पै. बाळू वाळूंज, पै. नारायण आडकर, पै. शंकर देशमुख, पै. बाळासाहेब काकरे, पै. किशोर सातकर, पै. अंकुश काकरे, पै. चंद्रकांत शिंदे, पै. नवनाथ बोडके, पै.दिपक दाभाडे , संघाचे सल्लागार पै. राजू बच्चे, पै. देविदास कडू यांनी अभिनंदन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा