व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास..! पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने जिंकले सुवर्णपदक । Maval News

ऑलिंपिकवीर मारुती आडकर यांच्यानंतर राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात पदक मिळविणारा मावळ तालुक्यासह शिवली गावचा दुसरा कुस्तीगीर ठरला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
Vaishnav Adkar from Maval won gold medal in first Greco-Roman Maharashtra Kesari wrestling tournament

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणीकंद येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ ग्रिकोरोमन अजिंक्यपद कुस्ती व पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा युवा राष्ट्रीय कुस्तीगीर पै. वैष्णव नारायण आडकर याने ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. ऑलिंपिकवीर मारुती आडकर यांच्यानंतर राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात पदक मिळविणारा मावळ तालुक्यासह शिवली गावचा दुसरा कुस्तीगीर ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व ओंकार कंद युथ फाउंडेशन व प्रदिपदादा कंद युवा मंचच्या वतीने लोणीकंद, पुणे येथे वरिष्ठ ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद व पहिली ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा युवा राष्ट्रीय कुस्तीगीर पै. वैष्णव नारायण आडकर याने ७२ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धाकांवर विजयी मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • वैष्णव याने आतापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चार पदकांची कमाई केली आहे. यामध्ये भोपाळ, मध्यप्रदेश व चेन्नई, तामिळनाडू येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णवचे सहा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे चौथे रौप्यपदक आहे. तर रांची, झारखंड व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राष्ट्रीय व राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.

वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव ॲड. पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै. तानाजी कारके, पै. भरत लिमण, पै.मनोज येवले, कार्याध्यक्ष पै. नागेश राक्षे, पै. निवृत्ती काकडे , पै. विष्णू शिरसाट, पै. धोंडिबा आडकर, पै. विश्वास वाघोले, पै. ऋषिनाथ शिंदे, पै. सुरेश आगळमे, पै. बाळू वाळूंज, पै. नारायण आडकर, पै. शंकर देशमुख, पै. बाळासाहेब काकरे, पै. किशोर सातकर, पै. अंकुश काकरे, पै. चंद्रकांत शिंदे, पै. नवनाथ बोडके, पै.दिपक दाभाडे , संघाचे सल्लागार पै. राजू बच्चे, पै. देविदास कडू यांनी अभिनंदन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


dainik maval jahirat

Previous Post

विजेच्या लपंडावाने वडगावकर त्रस्त, तालुक्याचे ठिकाण असुनही महावितरणचे दुर्लक्ष ; उद्योग, व्यवसाय, कामकाजावर परिणाम

Next Post

मोठी बातमी : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, दाभाडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sugar-Factory

मोठी बातमी : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, दाभाडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.