Dainik Maval News : देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 22019 पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे
राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदेमध्ये प्राप्त कमी दर दिलेल्या तीन निविदाकारांची निविदा मान्य करुन उच्चाधिकार समितीने 3 कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.
- अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन 420 ते 480 रुपये, तीन चाकी वाहन 450 ते 550, चार चाकी वाहन व जड वाहने 690 ते 800 रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन 450 रुपये, तीन चाकी 500, चार चाकी व जड वाहने 745 रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.
केंद्रीय मोटार नियम 1989 चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे.
तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे