Dainik Maval News : शिरगाव – परंदवडी पोलीस ठाणे हद्दीतील शिरगावच्या पवना नदीपात्रालगत असणाऱ्या एका अवैध दारूअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाऊई केली.
पवना नदीपात्रालगत मोकळ्या जागेत असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) कारवाई केली. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी दोन संशयित महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयित महिलांनी पवना नदीच्या पात्रालगत मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरगाव पोलिसांनी कारवाई केली.
हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित महिला पळून गेल्या. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे