Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अक्षीक्षक सत्यसाई कार्तिक यांना अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली असून त्यांची गडचिरोली येथे बदली झाली आहे.
लोणावळा विभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी गेल्या दोन वर्षांत मावळ तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात सातत्याने कारवाया करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता.
तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून ‘संकल्प नशामुक्ती’ अभियान राबवून तरूणाईला नशेपासून दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. एक प्रामाणिक आणि आदर्शवत अधिकारी असा त्यांच्या कामाचा ठसा लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीत उमटला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे