Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा 2025 – 20226 या आर्थिक वर्षासाठी 366 कोटी 74 लाख 97 हजार रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पास नुकतीच मंजुरी देण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्याला प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखालील सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक 1 लाख 99 हजार रुपये दखविण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरण सुधारणा हा महत्वाचा घटक आहे. गाव तलावांसाठी स्वच्छता अभियान, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटनक्षेत्र विकास अनुदानातून ग्रामदैवत डोळसनाथ मंदिराच्या विकासासाठी विशेष अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे.
- ऐतिहासिक गाव तळ्यामधून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासह महसुल वाढीसाठी अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि इतर शासकीय शुल्कांत किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर, भुयारी गटार योजनेचा कागदावरच फिरत असलेला प्रस्ताव सहाव्यांदा अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. याशिवाय नवीन प्रशासकीय इमारत, लिंबफाटा येथील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या अंदाजपत्रकानुसार, प्रामुख्याने स्थानिक कर, शासकीय अनुदाने आणि विविध शासकीय योजना व संस्थात्मक मदतीमधून जमेची बाजू तारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. शहराच्या विकासाची सगळी मदार स्थानिक कर, शासकीय अनुदाने, विविध शासकीय योजना आणि संस्थात्मक मदतीवर असल्याचे अंदाजपत्रकातून स्पष्ट होत आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :
1. प्रशासकीय राजवटीमधील तिसरा अर्थसंकल्प
2. रस्ते, पावसाळी जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य
3. गाव तलावाची पणन मंडळाच्या मदतीने स्वच्छता करणे
4. पावसाळी जल पुनर्भरणा ऐवजी पर्जन्य जलवाहिन्यांसाठी तरतूद
5. आरोग्य सुविधा, खेळाडू प्रोत्साहन योजना, दिव्यांगांसाठी तरतूद
6. भाजी मंडईचे नूतनीकरण, नगरपरिषद हॉल बांधणी, उद्याने विकास
7. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत स्वस्त व सुलभ वैद्यकीय सेवा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक