व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेचा 366 कोटी 74 लाख खर्चाचा व 1 लाख 99 हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा 2025 - 20226 या आर्थिक वर्षासाठी 366 कोटी 74 लाख 97 हजार रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पास नुकतीच मंजुरी देण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 3, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा 2025 – 20226 या आर्थिक वर्षासाठी 366 कोटी 74 लाख 97 हजार रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पास नुकतीच मंजुरी देण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्याला प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखालील सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक 1 लाख 99 हजार रुपये दखविण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरण सुधारणा हा महत्वाचा घटक आहे. गाव तलावांसाठी स्वच्छता अभियान, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटनक्षेत्र विकास अनुदानातून ग्रामदैवत डोळसनाथ मंदिराच्या विकासासाठी विशेष अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे.

  • ऐतिहासिक गाव तळ्यामधून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासह महसुल वाढीसाठी अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि इतर शासकीय शुल्कांत किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर, भुयारी गटार योजनेचा कागदावरच फिरत असलेला प्रस्ताव सहाव्यांदा अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. याशिवाय नवीन प्रशासकीय इमारत, लिंबफाटा येथील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अंदाजपत्रकानुसार, प्रामुख्याने स्थानिक कर, शासकीय अनुदाने आणि विविध शासकीय योजना व संस्थात्मक मदतीमधून जमेची बाजू तारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. शहराच्या विकासाची सगळी मदार स्थानिक कर, शासकीय अनुदाने, विविध शासकीय योजना आणि संस्थात्मक मदतीवर असल्याचे अंदाजपत्रकातून स्पष्ट होत आहे.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :
1. प्रशासकीय राजवटीमधील तिसरा अर्थसंकल्प
2. रस्ते, पावसाळी जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य
3. गाव तलावाची पणन मंडळाच्या मदतीने स्वच्छता करणे
4. पावसाळी जल पुनर्भरणा ऐवजी पर्जन्य जलवाहिन्यांसाठी तरतूद
5. आरोग्य सुविधा, खेळाडू प्रोत्साहन योजना, दिव्यांगांसाठी तरतूद
6. भाजी मंडईचे नूतनीकरण, नगरपरिषद हॉल बांधणी, उद्याने विकास
7. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत स्वस्त व सुलभ वैद्यकीय सेवा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या दिवशी देहूत वाहनांना नो -एन्ट्री ; बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

Next Post

आंबी येथील गावठी दारूभट्‌टीवर पोलिसांचा छापा ; 1 लाख 13 हजारांचे रसायन केले नष्ट। Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

आंबी येथील गावठी दारूभट्‌टीवर पोलिसांचा छापा ; 1 लाख 13 हजारांचे रसायन केले नष्ट। Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.