Dainik Maval News : संरक्षण खात्याच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डेपोत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने देहूगाव येथील चार जणांकडून 43 लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
आरोपीने आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या – शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र व प्रवेशपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार 15 ऑक्टोबर 2023 ते 4 मार्च 2025 या कालावधीत घडला.
सुभाष मगन पवार (वय 51, रा. खालुंब्रे ता. खेड) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कविता कैलास टिळेकर (वय 40, रा. श्रीकृष्ण मंदिरासमोर, माळवाडी, देहूगाव, ता. हवेली) यांनी बुधवारी (दि.5) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी पवार हा तळेगाव डेपोमध्ये पॅकर या पदावर काम करतो. गेल्या वर्षभरापासून तो कामावर गेलेला नाही. आरोपी पवार याने फिर्यादी टिळेकर आणि इतर तीन लोकांना संरक्षण विभागाच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावतो, असे सांगून शासकीय कागदपत्रे दाखवली.
फिर्यादीसह इतरांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीसह इतरांच्या मुलांना नोकरी लावण्यासाठी पवार याने त्यांच्याकडून एकूण ४३ लाख रुपये घेतले. तसेच, आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या व शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र व प्रवेश पत्रही त्यांना दिले. मात्र, नोकरी न लावता सर्वांची फसवणूक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन