Dainik Maval News : जय बजरंग तालीम मंडळ ट्र्स्ट वडगाव मावळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे होळी व धुलवड सणानिमित्त पारंपारिक मानाची दगडी गोटी उचलणे स्पर्धा व स्व. पै. केशवराव ढोरे क्रिडा पुरस्कार उत्कृष्ट खेळाडू २०२५ कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
यावेळी शिवप्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, तहसीलदार विक्रम देशमुख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार कदम, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम उपस्थित राहणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळाचे अध्यक्ष मंगेश रविंद्र तुमकर यांनी ही माहिती दिली.
- ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. वरिष्ठ गट (20 वर्षे वयपेक्षा अधिक) व कुमार गट (20 वर्षे वयपेक्षा कमी) या दोन गटात ही स्पर्धा होणार असून तालीम मंडळाचे संचालक यांच्याकडून विजेत्यांना चषक देण्यात येणार आहे. यासह २०२४ – २०२५ या दोन वर्षांत बैठका मारून रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या खेळाडूला स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वस्ताद उमेश प्रकाश ढोरे यांच्याकडून मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे.
यासह माजी राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू पै. चंद्रकांत सातकर, पै. संभाजी राक्षे, पै. तानाजी काळोखे, पै. राजाराम पाटील, पै. केतन घारे, पै. भक्ती जांभूळकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील नागरिक, खेळाडू यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका