व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News

लोणावळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाबाबत सदर बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 9, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
New deadline for Bhangarwadi railway flyover Lonavala Collector orders completion of land acquisition by April 10

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( maval taluka ) विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके ( mla sunil shelke ) यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाण पूल, खंडाळा तलावाजवळील नागरिकांच्या घराचा मुद्दा अशा अनेक प्रलंबित प्रश्वांबाबत ही आढावा बैठक पार पडली.

  • लोणावळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण ( Bhangarwadi railway flyover Lonavala ) पुलाबाबत सदर बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या बैठकीनुसार दहा मार्चपूर्वी काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच, मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्नावर तोडगा काढून येत्या 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन व इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच लोणावळा शहरातील खंडाळा तलावा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठीचा सर्वे एका आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला. तसेच खंडाळा येथील शाळेची उर्वरीत रक्कम भरण्याबाबत भू-संपादन अधिकारी यांनी आठ दिवसांत व्हॅल्युएशन करून नगरपरिषदेला कळवण्याचे आदेश दिले.

  • लोणावळा शहरातील भोंडे हायस्कूल यांना नगर परिषदेची शाळा सामंजस्य करार करून भाडेतत्त्वावर देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. तसेच अंतर्गत नूतनीकरण शाळेने करावे आणि लोणावळ्यातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सदर शाळेत विज्ञान विषयक शिक्षण द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

देहू नगर पंचायत हद्दीत गायरान जागेबाबत देहू नगर पंचायतीने घन कचरा व्यवस्थापन, नगर पंचायत इमारत, क्रीडांगण आणि रुग्णालय यासाठी लागणारी जागा, याबाबतचा प्रस्तावर लवकर तयार करून सादर करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनास जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासह तळेगाव दाभाडे शहरातील प्रलंबित शासकीय वसतीगृहाच्या जागेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका

Next Post

पवनानगर येथे महिलांना अत्याधुनिक शेती व फुल शेतीविषयी मार्गदर्शन । Pavananagar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Guidance for women in Pavananagar on modern agriculture and flower farming

पवनानगर येथे महिलांना अत्याधुनिक शेती व फुल शेतीविषयी मार्गदर्शन । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.