Dainik Maval News : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गायक अरिजित सिंग याचा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रविवारी (16 मार्च) दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल असेल, असे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.
ज्या वाहनधारकांकडे व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, अत्यावश्यक सेवा वाहनाचा पास असलेली वाहने द्रुतगती मार्गाच्या उजव्या बाजूने सोडली जातील. मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांना देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळून मामुर्डी गाव मार्गे, मुकाई चौकातून युटर्न घेऊन सिम्बायोसिस कॉलेज मार्गे, शितलादेवी मंदिर येथून लेखा फार्म मार्गे स्टेडियमकडे जाता येईल. देहूरोड सेंट्रल चौकाकडून येणारी वाहने किवळे ब्रिज खालून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने जातील. तसेच सेंट्रल चौकातून साई नगर फाटा मार्गे जातील.
- जुना मुंबई-पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात जाता येणार नाही.
पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांना किवळे ब्रिज मार्गे द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जाता येईल. निगडी हँगिंग ब्रिज कडून येणारी वाहने कृष्णा चौकातून द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जातील. गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश असेल.मामुर्डी गावातील रूहिझ बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकात नाका मार्गे जातील.
मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजुकडे येण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने कृष्णा चौकातून जातील. कार्यक्रम झाल्यानंतर किवळे गावमार्गे जाता येईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News