Dainik Maval News : कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (दि.२७) जाहीर झाली. अर्ज माघारीच्या दोन दिवसांनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी ही यादी जाहीर केली.
या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी २२६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी २६ दुबार, तर ५ नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात १९५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. त्यातून अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे.
- २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
उमेदवारांची अंतिम यादी :
ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) : ३ जागा
विदुरा नवले (ताथवडे)
चेतन भुजबळ (पुनावळे)
दत्तात्रय जाधव (नेरे, पो. जांबे)
बाळू भिंताडे (कासारसाई)
ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट) – ३ जागा
धैर्यशील ढमाले (बेळावडे)
यशवंत गायकवाड (नाणेगाव, पो. कुळे)
दत्तात्रय उभे (कोळावडे)
ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव) : ३ जागा
ज्ञानेश्वर दाभाडे (माळवाडी, पो. इंदोरी)
बापूसाहेब भेगडे (तळेगाव दाभाडे)
संदीप काशिद (इंदोरी)
ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर) : 3 जागा
छबुराव कडू (पाचाणे, पो. चांदखेड)
भरत लिम्हण (सांगवडे, पो. साळुंब्रे)
उमेश बोडके (गहुंजे, पो. देहूरोड)
ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-गिरूर-हवेली) : ४ जागा
अनिल लोखंडे (मरकळ)
धोंडिबा भोंडवे (शिंदे वस्ती, रावेत)
विलास कोतोरे (चिंबळी)
अतुल काळजे (काळजेवाडी, चऱ्होली बु.)
महिला राखीव – २ जागा
ज्योती अरगडे (काळुस)
शोभा वाघोले (दारुंब्रे)
अनुसूचित जाती-जमाती : १ जागा
लक्ष्मण भालेराव (काले पो. पवनानगर)
इतर मागासवर्ग : १ जागा
राजेंद्र कुदळे (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे)
विमुक्त जाती/भटक्या जमाती – १ जागा
शिवाजी कोळेकर (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड)
मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम
हिंजवडी-ताथवडे मतदारसंघासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. कारखाना कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली-शिरूर या तालुक्यांतील ५७ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. एकूण २२,२५८ जण मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
‘या’ उमेदवारामुळे लागली निवडणूक
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ मार्च होती. त्याच दिवशी सायंकाळी ‘निवडणूक बिनविरोध’ झाल्याचे बॅनरही झळकू लागले. मात्र, उमेदवारांची अंतिम यादी २५ व २६ मार्चला प्रसिद्ध केली नाही. हिंजवडी-ताथवडे गटामधून बाळू भिंताडे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दोन दिवस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केळे. पण, यश आले नाही. अखेर निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान
