व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला (इनर रिंग रोड) गती देण्याच्या दृष्टीने जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला (इनर रिंग रोड) गती देण्याच्या दृष्टीने जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गावांमधील जमीन मोजणीचे टप्पे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून वडाचीवाडी या गावातील १६.५ हेक्टर जागेची मोजणी करण्यात आली. दरम्यान, जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर जमीन मालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने दोन रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे (आउटर रिंग रोड) काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एसएसआरडीसी) देण्यात आले असून, अंतर्गत रिंग रोडचे काम (इनर रिंग रोड) पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे.

  • हा रिंग रोड ८३ किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी १४ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी १३ गावातील ११५ हेक्टर जागेचे संपादन जिल्हाधिकारी कार्यालयाने करावे, असा प्रस्ताव पीएमआरडीएकडून देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही झाली होती. त्यानंतर गावातील जमीन मोजणीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी पीएमआरडीएकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ११३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी ३० टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील ४४ गावांमधून ७४३.४१ हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी आवश्यक आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार आहे. त्यामध्ये ४२ जोड रस्ते, १७ पूल आणि १० बोगद्यांचा समावेश आहे. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी पाच मीटर रुंदीची जागाही आरक्षित ठेवली जाणार आहे.

या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव
वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदमवाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune

Next Post

रब्बी पिकांच्या काढणीनंतर मावळात उन्हाळ्यातील शेतजमीन मशागतीची कामे सुरू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pre-monsoon cultivation work in Maval taluka farm farmer rice

रब्बी पिकांच्या काढणीनंतर मावळात उन्हाळ्यातील शेतजमीन मशागतीची कामे सुरू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.