Dainik Maval News : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.27) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात झाले. दोन्ही अपघातात पीएमपी बसचा सहभाग असून पहिला अपघात वडगाव मावळ हद्दीत झाला तर दुसरा अपघात टाकवे खुर्द हद्दीत झाला.
टाकवे खुर्द येथे फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपीएमएलची बस थांबली असता पाठीमागून येणारा दुचाकीस्वार बसला धडकला व अपघात झाला. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले.
सदर अपघातामुळे पुन्हा एकदा सर्व्हिस रोडचा मुद्दा चर्चेत आला आहे. सर्व्हिस रोड नसल्याने आणि पीएमपीएमएलचे बस थांबे नसल्याने प्रवासी रस्त्यावर व उन्हात ताटकळत उभे थांबतात. तर पीएमपी बस चालकही भरधाव वेगात येऊन थेट नेहमीच्या ठिकाणी रस्त्यावर बस थांबवितात, त्यामुळे असे अपघात हे सातत्याने होत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान
