Dainik Maval News : काही दिवसापूर्वीच बीज सोहळा, शिवजयंती उत्सव संपन्न झाले. त्यानंतर गुढीपाडवा, रमजान ईद हे सण होत असताना पुढे श्रीराम नवमी, हनुमान जयंती असे विविध सण जयंती कार्यक्रम महिनाभरात आहेत. याकाळात जातीय सलोखा राहावा, कायदा सुव्यवस्थाचे पालन व्हावे, या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, सामाजिक मंडळे, विविध पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- सण साजरे करताना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, डीजेचा वापर करू नये, वेळेत आणि शांततेत सण साजरा करावा, जातीय सलोखा राखावा, असे सांगत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन देहूरोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी केले आहे.
याप्रसंगी देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, शिरगावच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार, तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव आदी अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा