Dainik Maval News : अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) सहारा ग्रुपवर मोठी कारवाई करीत लोणावळा जवळील अॅम्बी व्हॅली सिटीमधील 707 एकरची जमीन जप्त केली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे 1460 कोटी रुपये आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. ( ED action against Sahara Group 707 acres of land seized in Aamby Valley City Near Lonavala )
- सहारा ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून मिळालेल्या पैशातून ही उच्च किमतीची जमीन खरेदी करण्यात आली होती आणि खरी मालकी लपविण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, असे ईडीकडून सांगण्यात आले.
सहारा ग्रुपच्या कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांचा वापर करून बेनामी नावांनी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. याशिवाय, पीएमएलएच्या कलम 17 अंतर्गत केलेल्या छाप्यादरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी 2.87 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.
हुमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (HICCSL) आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याबद्दल ओरिसा, बिहार आणि राजस्थानमध्ये तीन एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून, सहाराशी संबंधित अनेक कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध देशभरात 500 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News