मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 251 लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली. माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्या माध्यमातून हे शक्य झाले. भाजपच्या वडगाव पक्ष कार्यालयात गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी याचे वाटप करण्यात आले. ( Work Order To 251 Beneficiaries Of Maval Taluka Under Pradhan Mantri Awas Yojana )
या योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातून 16700 जणांनी लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांनी छाननी होऊन पहिल्या टप्यात मावळ तालुक्यातील पहिल्या टप्प्यामधील शिवणे, भोईरे, साते, ठाकूरसाई ,कढधे, डोने, ब्राम्हणोली, करंजगाव, ओवळे, काले, धनगाव, दिवड, महागाव, येलघोल, पुसाने ,आढले खुर्द, येळसे, साळुंब्रे आदी गावांमध्ये नियम अटीचे पालन करून 1398 व त्यानंतर 615 असे 2013 घरांना पक्के बांधकाम करण्यास मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. त्यातील 251 लाभार्थ्यांना गुरुवारी प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, जेष्ठ नेते शंकर शेलार, तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे, महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे, संघटनमंत्री किरण राक्षे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, निकिता घोटकुले, कल्याणी ठाकर, उपसभापती शांताराम कदम, दत्ताभाऊ शेवाळे, महिला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, बाबूलाल गराडे, गणेश धानिवले, जितेंद्र बोत्रे, अनंता कुडे, अभिमन्यु शिंदे, बाळासाहेब जाधव आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ( Work Order To 251 Beneficiaries Of Maval Taluka Under Pradhan Mantri Awas Yojana )
योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्लींथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यावर 1,00,00 रू, दुसऱ्या टप्प्यात छताचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 1,00,000, तिसऱ्या टप्प्यात घराचे बांधकाम पूर्ण होऊन सर्वात महत्वाचा दाखला मिळाल्यानंतर 50,000 हजार असे लाभार्थ्यास एकुण 2,50,000 रुपये रक्कम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहेत.
अधिक वाचा –
– एल अँड टी कंपनीतील उपोषणकर्त्या कामगारांसाठी खासदार श्रीरंग बारणेही मैदानात; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना निवेदन
– महत्वाची बातमी! दिनांक 4 डिसेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, बेरोजगारांना नोकरींची सुवर्णसंधी