नवलाख उंबरे येथील लार्सन अँड टुब्रो ( L & T ) कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या 236 कामगारांना 1 डिसेंबरपर्यंत कामावर घेतले नाही तर 2 डिसेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी बंद केली जाईल, असा इशारा मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला आहे. त्यानंतर आता मावळचे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे हेही कामगारांना न्याय मिळावा म्हणून मैदानात उतरले आहेत. ( Letter To CM Eknath Shinde And Industries Minister By MP Shrirang Barane For L & T Company Labour )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी खासदार बारणे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विनंती केली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, कामगारमंत्री सुरेश खाडे आणि कामगार आयुक्त यांनाही निवेदन दिले आहे.
हेही वाचा – L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
मागील काही महिन्यांपासून एल अँड टी कंपनीकडून कामगारांची पिळवणूक सुरु आहे. काही कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या बदल्या करणे, कामावरुन काढणे, मानसिक त्रास देणे असा प्रकार सुरु केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे न्याय, हक्कांसाठी या भूमिपूत्रांनी 19 ऑक्टोबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्याला 44 दिवस उलटून गेलेत. कंपनी मात्र अद्याप सहकार्याची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे यात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी लक्ष घालण्याची मागणी श्रीरंग बारणेंनी केली आहे. ( Letter To CM Eknath Shinde And Industries Minister By MP Shrirang Barane For L & T Company Labour )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! दिनांक 4 डिसेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, बेरोजगारांना नोकरींची सुवर्णसंधी
– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा