व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळातील ‘या’ गावांत घरोघरी येणार जलगंगा, आमदार शेळकेंच्या माध्यमांतून 4 कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

जल जीवन मिशन अंतर्गत माळेगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 5 लाख, पिंपरीसाठी 1 कोटी 41 लाख, माळेगाव बुद्रक तळपेवाडीसाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Tap-Water-Scheme

Photo Courtesy : fb / sunil shelke


आंदर मावळातील माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक – तळपेवाडी , पिंपरी येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकुण 4 कोटी 1 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दिनांक 27 नोव्हेंबर) महिला भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

जल जीवन मिशन अंतर्गत माळेगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 5 लाख, पिंपरीसाठी 1 कोटी 41 लाख, माळेगाव बुद्रक तळपेवाडीसाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( Water Supply Scheme at Malegaon Talpewadi Pimpri In Andar Maval Under Jal Jeevan Mission )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

असे होणार योजनेचे काम ;

  • माळेगाव खुर्द येथे पंचवीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि साडेतीन किलोमीटर पाईपलाईन
  • पिंपरी येथे एकोणतीस हजार लिटर क्षमतेची टाकी आणि सहा किमी पाईपलाईन
  • माळेगाव बुद्रुक तळपेवाडी येथे आठ किमी पाईपलाईन करण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

आंदर मावळातील दुर्गम भागात असणारी ही गावे आहेत. येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते. या समस्येची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करुन या गावांतील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

हेही वाचा – L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा

#आंदर मावळातील माळेगाव खु. पिंपरी, माळेगाव बु.-तळपेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला.जल जीवन मिशन @jaljeevan_ अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण ४‌ कोटी ०१ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. pic.twitter.com/zAxzSFQsx9

— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 28, 2022

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, संगिता शेळके, माजी सभापती शंकरराव सुपे, लक्ष्मणराव ठाकर, दत्तात्रय पडवळ, सरपंच साधना काठे, उपसरपंच अंकिता गायकवाड, सदस्य बाळासाहेब खंडागळे, शंकर बोऱ्हाडे, रोहिणी कोकाटे, कुंदा बोऱ्हाडे, ग्रामसेवक राहुल देशमाने, राजेश कोकाटे, मारुती करवंदे, सरपंच इंगळुण सुदाम सुपे, भरत जोरी, कल्पेश मराठे, सुनिल ताते, अंकुश ठाकर, बाबासाहेब घाडगे, कमल कोकाटे,अरुण मोरमारे, दशरथ दगडे, यमाजी बोऱ्हाडे, चिंधु बोऱ्हाडे, सविता बोऱ्हाडे, शशिकला सातकर, आदिका तनपुरे, अनिता आंद्रे इ उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या
– खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग
– कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! उतारावर अनियंत्रित ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रक 100 फूट दरीत कोसळला, 1 ठार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-On-Mumbai-Pune-ExpressWay

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! उतारावर अनियंत्रित ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रक 100 फूट दरीत कोसळला, 1 ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.