व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव

मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) कोंडिवडे ( Kondhiwade ) येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची वडगाव पोलिसांनी ( Vadgaon Maval Police ) उत्तराखंडमधून ( Uttarakhand ) सुखरूप सुटका केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2022
in देश-विदेश, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) कोंडिवडे ( Kondhiwade ) येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची वडगाव पोलिसांनी ( Vadgaon Maval Police ) उत्तराखंडमधून ( Uttarakhand ) सुखरूप सुटका केली आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडिवडे येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाले होते. तिच्या वडिलांनी फिर्यादीत ऋषिकेश शरद गायकवाड याने मुलीला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केला होता. ( Kidnapped girl from Kondivade rescued from Uttarakhand state )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी नसल्याचे दिसून आले. लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी मोबाईल फोन ट्रॅक केला असता पीडित मुलगी ही संशयित आरोपीबरोबर असल्याचे दिसून आले. आरोपी तिला लोणावळाहून ठाणे आणि तिथून पुढे उत्तराखंड येथे घेऊन गेला असल्याचे दिसून आले.

त्यानंतर पोलिस निरीक्षक भोसले यांनी तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सचिन काळे, निर्मला उप्पू, शशिकांत खोपडे यांचे पथक उत्तराखंडमध्ये रवाना केले. हरिद्वार येथील पोलिस पथकाने वडगाव मावळ पोलिस पथकांस बरोबर घेऊन मोबाईल टॉवर लोकेशनवरून मुलीचे आणि आरोपीचे शोधकार्य चालू केले असता एका लॉजमध्ये दोघे जण आढळून आले. पोलिसांनी मुलीला सुखरूप ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि दोघांना वडगाव मावळ येथे घेऊन आले.

हेही वाचा – स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना

सध्या अल्पवयीन बालिकांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत जागृत होऊन अल्पवयीन मुलांच्या मोबाईल फोन वापरावर देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.

अधिक वाचा –

– L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
– खळबळजनक! वडगाव मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आत्म’हत्येचा प्रयत्न
– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल


Previous Post

शिवसेनेचे नवीन संपर्कप्रमुख जाहीर, पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखपदी ‘यांची’ नियुक्ती

Next Post

खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Khadi-Gramodyog-Sangh

खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.