लोणावळा शहरात ( Lonaval City ) एका तरुणीचा ( Girl ) सार्वजनिक ठिकाणी विनयभंग ( Molested ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी अभिषेक विजय गवऴी (रा.गवऴीवाडा, ता.मावऴ जि. पुणे) या तरुणावर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 354 (ड), 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Girl Molested In Lonavala Case Registred In City Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही लोणावळा शहरातील बस स्टँड भागातील शांती चौक येथे असताना सदर आरोपी तरूण तिच्याजवळ आला आणि तिचा हात बळेच धरुन तिला, ‘तू माझ्याशी बोलत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे बोलू लागला. तसेच, तिला दमदाटी आणि शिवीगाळ करू लागला. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने तरुणी प्रचंड घाबरली, त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेत सदर घटनेची फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बावकर हे करत आहेत.
अधिक वाचा –
– स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॅगनर कारचा अपघात, बालकांसह चार जखमी, खोपोलीजवळील घटना