Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावांसह परिसरातील उद्योग धंदे, व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगराकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारे पवना धरण आटू लागले आहे. सद्यस्थितीत (शनिवार, दि. 3 मे) पवना धरणात अवघा 33.77 टक्के पाणीसाठा शिल्लक असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागलेली असताना पाण्याचा वापर देखील वाढला आहे. परंतु सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे जलस्त्रोतांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. पवना धरणावर अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सोबत पिंपरी-चिंचवड सारख्या शहरासाठी पवना धरण हे प्रमुख जलस्त्रोत आहे. त्यामुळे पवनेतील पाण्याचे योग्य नियोजन होणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे.
पवना धरणात सध्या 33.77 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला धरणातील पाणीसाठा 33.10 टक्के इतका होता. धरण विभागाकडून पाणी वाटप व नियोजन हे 30 जून पर्यंत करण्यात आलेले आहे. तरीही पावसाळा लांबल्यास व उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठ्यात घट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे पवना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News