Dainik Maval News : वेहेरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात मावळ तालुक्यात सर्वसामान्य कुटुंबातील पाच जोडप्यांचा शुभ विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते.
- सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमाने विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळदी समारंभ, त्यानंतर भोजन व सायंकाळी मान्यवरांच्या आणि हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न झाला. विवाहास आलेल्या पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्था मुरारीलाल शर्मा यांंच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान विवाह सोहळ्यावेळी काही काळ पावसाने व्यत्य आणला. परंतु नंतर विवाह सोहळा सुंदरपणे पार पडला.
विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूस सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, नथनी, पैंजण, जोडवी व मनगटी घड्याळ देण्यात आले. तसेच साखरपुड्याची साडी, लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आल्या. तर, वरांना देखील साखरपुड्याचा, लग्नाचा पोशाख आणि मनगटी घड्याळ देण्यात आले. तसेच बँड बँजो पथकासह वरराजांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, संदीप वाघिरे ,पंढरीनाथ ढोरे, गणपत भानुसघरे, मिलिंद बोत्रे, बाळासाहेब भानुसघरे, जितेंद्र बोत्रे, गणपत पडवळ, मधुकर पडवळ, बबन माने उपस्थित होते.
तर, विवाह सोहळ्याचे आयोजन व नियोजन सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अशोक पडवळ, नितीन देशमुख, सचिन भानुसघरे, शरद हुलावळे, सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे, भाऊसाहेब हुलावळे, अमोल भेगडे, सुनिल गरुड, मुरारीलाल शर्मा, मच्छिंद्र केदारी, मंगेश हुलावळे, नितिन वाडेकर, विशाल जमदाडे, सीमा आहेर आदी सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne