Dainik Maval News : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक वर्ग इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याची वाट पाहत होते. अखेर आज (दि. १३ मे) तो दिवस उजाडला असून दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा संपूर्ण राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा ९४.१० टक्के इतका लागल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
14 लाख 55 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुलींची टक्केवारी अधिक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.
राज्यातील विद्यार्थी हुश्शार
यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील २११ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. तर, राज्यात ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ उतीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकाल
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
औरंगाबाद : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.८७ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९८.८२ टक्के
निकाल जाहीर –
संपूर्ण राज्याचा निकाल – 94.10 टक्के
मुलींचा निकाल – 96.14 टक्के
मुलांचा निकाल – 92.31 टक्के
मागील वर्षापेक्षा निकालात 1.71 टक्क्यांची घट
पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल
1. https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
3. http://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8. https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro