Dainik Maval News : मावळ तालुक्याकील घेरेवाडी, लोहगड येथील निलेश बाळू कोकरे याची पोलीस भरती परीक्षेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पुणे कारागृह विभागात यशस्वीपणे निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल तालुक्याभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निलेशने कार्ला येथील एम.एच. करिअर अकादमीत अभ्यास आणि परीक्षेचा सराव केला. सकाळच्या क्षेत्रीय प्रशिक्षणापासून ते लेखी परीक्षेपर्यंत निलेशने प्रामाणिकपणे मेहनत घेतली. तसेच अकादमीचे मितेश हुलावळे, विजय जंगम यांचे त्याला बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
वेळेचे योग्य नियोजन आणि दृढ निश्चयाच्या जोरावर निलेशने यशश्री खेचून आणली असून त्याच्या यशाने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. पोलीस दलात निवड झाल्यानंतर एम.एच. करिअर अकादमी, परिसरातील नागरिक, मार्गदर्शक शिक्षकवर्ग आणि सहकारी विद्यार्थ्यांनी निलेशचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro
