Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्या मार्फत कुशाग्रा इनोवेशन फाउंडेशन पुणे यांनी नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कार्यशाळेअंतर्गत दोन सत्रात प्रशिक्षित केले.
स्वच्छ भारत अभियान हा केंद्र शासन व राज्य शासन यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व कामगार यांची क्षमता बांधणी होणे, आवश्यक आहे, यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
या दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप व आवश्यक संसाधने, नागरिकांशी संवाद, आरोग्य व विविध योजना बाबत पूरक माहिती देण्यात आली. तसेच विमा, मुलांसाठी शासकीय शिष्यवृत्तीचे लाभ, आरोग्याची काळजी, कुटुंबाची काळजी आदी गोष्टींची क्षमता बांधणी करून घेण्यात आली.
यावेळी नगरपंचायतीकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी सफाई कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro
