Dainik Maval News : वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडले, यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३ मे) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा येथे घडली. अपघातात मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे. सध्या कार्यरत, वडगाव पोलीस स्टेशन ता. मावळ जि. पुणे) अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून चाकणच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने तळेगाव फाटा येथे निष्काळजीपणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून व बेजबाबदार वाहन चालवून कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस मिथुन धेंडे यांना धडक देऊन चिरडले. यात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतरही कंटेनर चालक तिथे न थांबता चाकण बाजूला वेगाने निघून गेला. मुळात हा कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक पद्धतीने व भरधाव वेगाने वाहन चालवित होता, असे एका तरुणाने सांगितले असून त्याने त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे. त्यानेही ही माहिती पोलीस कंट्रोलला दिली होती. परंतु कंटेनर थांबविण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाही कंटेनर चालकाने चिरडले व पुढे निघून गेला.
सदर अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे. महत्वाचे म्हणजे मयत मिथुन धेंडे यांचा आज (दि. १४ मे) रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधल्या रात्रीच त्यांचा असा अपघाती व दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी भेट दिली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून आमच्या पोलिसाचा खून झाल्याचे म्हटले आहे.
संबंधित कंटेनर चालकास लवकरात लवकर पकडून कठोरातील कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro