संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर केल्यासा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ( Using Tuka Mhane Word For Sending Messages On Social Media Will Be Actionable Said Saint Tukaram Maharaj Sansthan Dehu )
महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर देखील राष्ट्रपुरुष, देवाधिकांबद्दल अवानकारक कृती होताना किंवा वक्तव्ये होताना दिसत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल सध्या राज्यात जणू अवमानकारक आणि अपमानजनक वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातही एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशात श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांमध्ये नववर्षांच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्यास संस्थान कठोर कारवाई करणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देहू संस्थानच्यावतीने नव वर्षासाठी शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्दप्रयोग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुका म्हणे’ या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच संत, महापुरुष यांच्याबद्दल असे काही होताना दिसून आल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
अधिक वाचा –
– जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 95 लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे चेक वाटप, बाजीराव ढमालेंनी मांडल्या दिव्यांगांच्या समस्या
– मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली