Dainik Maval News : प्रतिष्ठित कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्री करणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 21) दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी उमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र साहेन सिंग (वय ३६) यांनी बुधवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर दुकानदारांनी बनावट कपड्यांना प्रतिष्ठित कंपनीचे नाव आणि लोगो वापरून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ब्रँड हबचे मालक अमर शाम चव्हाण (वय २९, रा. तळेगाव दाभाडे), छत्रपती मेन्स अटायरचे मालक प्रसाद नवनाथ कूल (वय २९, रा. तळेगाव दाभाडे), एचपी क्लोथ स्टोअरचे मालक हितेश उदयसिंग परदेशी (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे), आऊट लुक मेन्स वेअरचे मालक सौरव रोहिदास उबाळे (वय २५, रा. इंदोरी, मावळ), जयश्री एन एक्सचे मालक हरेश मोतीराम देवासी (वय २५, रा. तळेगाव दाभाडे), लिमिटेड एडिशन व सेकंड स्किनचे मालक शशांक दीपक जैन (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही दुकानदार बनावट कपडे विक्री करत असल्याची माहिती पुमा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सिंग यांना मिळाली होती. त्यांनी दुकानात जाऊन खात्री केली असता पुमा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट कपड्यांची विक्री केली जात होती. महेंद्र सिंग यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सहा दुकानांवर कारवाई केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News