Dainik Maval News : चारित्र्यावर संशय घेऊन आदिवासी महिलेची पतीकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. सोनाबाई अशोक वाघमारे (वय ३३, रा. कोंडिवडे, ता. मावळ) असे मृत महिलेचे नाव असून अशोक बारकु वाघमारे (रा. कातकरी वस्ती, कोंडीवडे ता. मावळ) आरोपी पतीने नाव आहे.
याप्रकरणी मारूती काळुराम पवार (वय 50 वर्षे, रा. कातकरी वस्ती, कोंडीवडे (आ. मा) ता. मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
वडगावचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मयत मुलगी सोनाबाई वाघमारे ही तिचा नवरा व फिर्यादीचा जावई यांच्यासह त्यांच्याच गावी राहत होते. आरोपी अशोक वाघमारे हा पत्नी सोनाबाईवर संशय घेवून शिवीगाळ करीत मारहाण करीत असे.
शुक्रवारी ते दोघे सकाळी मासेमारी करण्यासाठी जात असताना 6.55 त्या सुमारास मौजे कोंडीवडे (अ.मा.) गावच्या हद्दीत आरोपीने वनविभागाच्या हद्दीतील ओढ्यामध्ये आरोपी अशोक वाघमारे याने पत्नी सोनाबाई वाघमारे हिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी करून ठार मारले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक डोईजड हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News