Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता १८ मीटरऐवजी १२ मीटर करावा. तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला आहे. हा रस्ता १८ मीटर रुंद केल्यास लगतची तब्बल ६९ कुटुंबे बेघर होण्याची भीती आहे. ही कुटुंबे बाधित होऊ नयेत, म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याऐवजी ती १२ मीटर करून रस्ता करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
मारुती मंदिर चौकातील नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळआळी गणपती मंदिरापर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ घरांना नोटीस दिल्या होत्या.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या नोटीस आल्यानंतर हे नागरिक हवालदिल झाले होते. त्या सर्वांनी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व अरूण माने यांच्याकडे धाव घेऊन ही कारवाई थांबवावी, अशी मागणी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन