व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road

तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८ डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुधारणा प्रकल्पाबाबत राज्य शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 23, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Talegaon Chakan Shikrapur Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८ डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुधारणा प्रकल्पाबाबत राज्य शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरूवात होणार आहे.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिलेले सहकार्य आणि पाठबळ खरोखरच महत्त्वाचे ठरले. तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील रस्ते विकासाला गती मिळणार आहे.”

  • या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता, तर चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५३.२ किमी लांबीच्या या मार्गासाठी शासनाने ३९२३.८९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) ३० वर्षांच्या सवलत धोरणांतर्गत (Concession Model) राबवण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी देखील MSIDC कडेच असणार आहे.

“या मार्गामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग यांच्यातील महत्त्वपूर्ण दळणवळण सुकर होणार आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून पाहता, चाकण-तळेगाव पट्ट्याला अधिक गती मिळेल. हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची ग्वाहीच आहे,” असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “हा निर्णय होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. शासनाच्या पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर आता अधिकृत शासन आदेश देखील निघाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


Previous Post

वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News

Next Post

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक । Vaishnavi Hagawane Suicide Case

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vaishnavi Hagawane Suicide Case

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक । Vaishnavi Hagawane Suicide Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.