व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, January 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक । Vaishnavi Hagawane Suicide Case

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ( Vaishnavi Hagawane Suicide Case )

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 23, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Vaishnavi Hagawane Suicide Case

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याना स्वारगेट मधून अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून हे दोघे फरार होते आणि पोलिसांच्या अनेक पथकांकडून त्यांचा शोध सुरू होता. ( Vaishnavi Hagawane Suicide Case )

गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचे आता समोर आले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी वैष्णवीच्या पालकांच्या तक्रारीनंतर वैष्णवीचा पती शशांक आणि सासू, नणंद यांना आधीच अटक केली आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार आज (दि. 23 मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास फरार सासरा आणि दीर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे अवघड होते. अखेर आज पहाटे स्वारगेट मधून बावधन पोलिसांनी त्यांना अटक केली असून ठाण्यात आणण्यात आले आहे. ( Vaishnavi Hagawane Suicide Case Absconding Rajendra Hagavane Sushil Hagavane arrested )

राजकीय नेत्यांकडून आश्वासन –
दरम्यान गुरुवारी (दि. 22 मे) दिवसभर राजकीय नेत्यांनी वैष्णवीचे पालक कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबाशी संवाद साधला होता. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. अखेर फरार आरोपींनाही अटक झाली असून लवकर ह्या प्रकरणी न्याय मिळेल अशी आशा आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


Previous Post

मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road

Next Post

पावसाळ्यापूर्वी लोणावळ्यातील नालेसफाई पूर्ण करा ; पोलीस, विद्युत विभागानेही कामांचे नियोजन करावे – देविदास कडू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala-Municipal-Council

पावसाळ्यापूर्वी लोणावळ्यातील नालेसफाई पूर्ण करा ; पोलीस, विद्युत विभागानेही कामांचे नियोजन करावे - देविदास कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Digital battle in Mumbai Municipal Elections BJP leads campaign with Marvel style campaign

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’ स्टाईल कॅम्पेनद्वारे भाजपाची प्रचारात आघाडी

January 12, 2026
For first time after independence electricity will reach Rajmachi area in Maval DPDC approves electricity project

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच मावळातील राजमाची परिसरात पोहोचणार वीज ; जिल्हा नियोजन समितीतून 4 कोटी 64 लाखांचा वीज प्रकल्प मंजूर

January 12, 2026
Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची आज होणार निवड

January 12, 2026
Unknown-Dead-Body

Vadgaon Maval : वडगाव मावळमधील पोटोबा महाराज मंदिराजवळ अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

January 12, 2026
Pune Zilla Parishad Administrator Gajanan Patil visits Zilla Parishad School in Navlakh Umbre

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक गजानन पाटील यांची नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषद शाळा आणि पशूवैद्यकीय दवाखान्यात भेट

January 12, 2026
Chief Minister Devendra Fadnavis master plan and a new era of infrastructure in Mumbai

मायानगरीचा महाकायापालट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन’ आणि मुंबईत पायाभूत सुविधांचे नवे युग

January 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.