Dainik Maval News : भरधाव वेगातील ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे रविवारी (दि. १) सकाळी घडली. राजेश राजद्राई (वय २८ वर्षे, मूळ रा. नागापट्टीनम, तामिळनाडू) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
विजय राघवान सुब्बाराज (वय ३३, रा. अर्वन लाईफ सोसायटी, कातवळी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याबाबत रविवारी (दि. १) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच १४ इएम ९०७५) या ट्रेलरवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ७.५६ वाजताच्या सुमारास ट्रेलर चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून फिर्यादीच्या चुलत भावाच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

