व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा : पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा ; देहू संस्थानची मागणी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज 340व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराज 340व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतीच श्रीक्षेत्र देहूगाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

  • पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वारीनिमित्त भक्ती-शक्ती येथून पालखी सोहळा आकुर्डीकडे मुक्कामी जात असताना पालखी सोहळा एका बाजूने, तर काही वारकरी भाविकभक्त दुसर्‍या बाजूने चालत जात असतात. त्यांना कुठे अडचण होऊ नये, यासाठी रेल्वे मेट्रोचे सुरू असलेले काम आठ दिवस बंद ठेवावे, अशी मागणी केली आहे.

तसेच, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी महाद्वारातून 395 दिंड्यांना प्रवेश द्यावा. या दिंड्या वारकरी भाविक भक्त प्रदक्षिणा घालून नारायण महाराज समाधीकडील दरवाजावाटे बाहेर पडतील. या वेळी भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनबारीतून मुखदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करावी.

  • संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी इनामदार साहेब वाड्यात येत असतो. या इनामदारसाहेब वाड्याचे प्रवेशद्वार अतिशय लहान आकाराचे आहे. या ठिकाणी भाविकभक्तांची गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

परंपरेनुसार पालखी सोहळा इनामदारसाहेब वाडा येथून निघाल्यानंतर पहिल्या समाज आरतीसाठी अनगडशाहबाबा दर्गा या ठिकाणी थांबत असतो. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्र ठेवणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

‘या’ दिवशी वाहतूक बंद ठेवावी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इनामदारसाहेब वाड्यातून 19 जून रोजी सकाळी लाखो वारकरी भाविकभक्तांच्या उपस्थितीत मार्गस्थ होणार आहे. या दिवशी निगडी ते देहूरोड आणि देहूरोड ते देहू या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवावी; जेणेकरून वारकरी भाविकभक्तांना पायी प्रवास करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारे देहू देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यात चर्चा होऊन विश्वस्तांनी वरील मागण्या केल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू, नवलाख उंबरे येथील घटना । Maval News

Next Post

‘पीएमआरडीए’कडून पुणे जिल्ह्यातील १५० प्रस्तावित रस्त्यांसाठी भूसंपादन सुरू ; मावळ, मुळशी, हवेली, शिरूर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PMRDA

'पीएमआरडीए'कडून पुणे जिल्ह्यातील १५० प्रस्तावित रस्त्यांसाठी भूसंपादन सुरू ; मावळ, मुळशी, हवेली, शिरूर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.