Dainik Maval News : नाणे मावळ विभागातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या शिवाजी पवार यांची निवड झाली आहे. मावळत्या सरपंच ममता सोरकादे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विहित मुदतेत सरपंच पदासाठी कौशल्या पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल स्वाती शिंदे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतीचे एकूण नऊ पैकी सहा सदस्य निवडीवेळी उपस्थित होते. कौशल्या पवार यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी, ग्रामस्थांनी एकच जल्लोष करीत अभिनंदनाचा वर्षाव केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप आंद्रे आणि साईनाथ गायकवाड यांनी नवनिर्वाचित सरपंच कौशल्या पवार यांना आमदार सुनील शेळके यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रामदास मराठे, राजाराम साबळे, नाथा गायकवाड, काळाराम भालसिंगे, विठ्ठल तंबोरे, रोहिदास गायकवाड, विजय साबळे, वसंत साबळे, सबाजी कुडले, मधुकरराव गवारी, नाना साबळे, श्री लालगुडे, सुधीर आंद्रे, मच्छिंद्र गायकवाड, संतोष भालसिंगे, भाऊ साबळे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

