व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

पुणे-मुंबई महामार्गावरील १५ अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्रांची एमएसआरडीसीकडून दुरूस्ती करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2025
in पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
old Mumbai Pune highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-मुंबई महामार्गावरील १५ अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्रांची एमएसआरडीसीकडून दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्जन्यकाळ तोंडावर आल्याने पावसाळ्याच्या दिवसांत होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील १५ अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती केली. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. मागील वर्षी याच भागात वेगवेगळ्या अपघातांत सुमारे ८८ जणांचा मृत्यू झाला होता.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे काही भाग अपघातप्रवण म्हणून ओखळले जातात. त्यावर महामंडळाने सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या मदतीने विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. यातील १५ अपघातप्रवण स्थळांची पडताळणी करून आकडेवारीच्या आधारे आणि अभियांत्रिकी उपायांतून तोडगा काढण्यात आला आहे.

त्यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथील टोल नाक्याजवळील पेट्रोल पंपापासून महानगर गॅस लिमिटेड कंपनीपर्यंत असलेल्या भागातील १५ अपघातप्रवण स्थळांचा यामध्ये समावेश आहे. त्यातही प्रामुख्याने वडगाव फाटा, कामशेत घाट परिसर, शिलाटणे फाटा आणि खालापूर भागाचा समावेश आहे.

महामार्गावर करण्यात आलेल्या उपाययोजना
अपघातप्रवण भागातील दुरुस्तीमध्ये कमी दृश्यमानता, पादचार्‍यांना असणारा धोका, वेगाने येणार्‍या वाहनांसाठी गतिरोधक, यांवर काम केले गेले. तसेच, या ठिकाणी मध्यवर्ती बंदिस्त भिंत अर्थात डिव्हायडरचा वापर, वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त असुरक्षित पद्धतीने वाहने चालविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कॅमेर्‍यांचा वापर होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


Previous Post

‘मोरया’ प्रतिष्ठानकडून दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार । Vadgaon Maval

Next Post

वडगाव मावळ, लोणावळ्यात ‘आरटीओ’चे पक्का वाहन परवाना शिबिर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

वडगाव मावळ, लोणावळ्यात 'आरटीओ'चे पक्का वाहन परवाना शिबिर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.