Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संचलित वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघ, मावळ तालुका या संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वानुमते संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार सचिन ठाकर यांची निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी दैनिक मावळचे संपादक विशाल कुंभार, मावळ २४ तासचे संपादक महादेव वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. सोबत कार्याध्यक्षपदी साम टीव्हीचे तालुका प्रतिनिधी दिलीप कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
मंगळवार, दि. १ जुलै रोजी वडगाव मावळ येथील वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाची सहविचार सभा व नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी विशेष बैठक पार पडली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते संघाची नूतन कार्यकारिणी निवडली. तसेच वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी केली.
वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघ, मावळ तालुका संघाची नूतन कार्यकारिणी :
मुख्य प्रवर्तक : विजय सुराणा
अध्यक्ष : सचिन गो. ठाकर
उपाध्यक्ष : विशाल कुंभार, महादेव वाघमारे
कार्याध्यक्ष : दिलीप कांबळे
सचिव: योगेश घोडके
सहसचिव : दक्ष काटकर
खजिनदार : विकास वाजे
प्रकल्प प्रमुख : रवि ठाकर
पत्रकार परिषद प्रमुख : अतुल चोपडे
सल्लागार : बाळासाहेब वाघमारे, भारत काळे, दत्तात्रय म्हाळसकर, सचिन शिंदे
सदस्य : गणेश दूडम, संजय हुलावळे, धनंजय नांगरे, निलेश ठाकर, अभिषेक बोडके, राहुल सोनवणे, संजय दंडेल, सतीश गाडे, सचिन सोनावणे, सुनील आढाव, मुकुंद परंडवाल.
कार्यकारिणी निवडीनंतर सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन ठाकर यांनी तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करीत सर्वांना सोबत पत्रकार संघाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक