Dainik Maval News : पवन मावळ विभागातील ठाकूरसाई येथे कुबेर व्हिला बंगल्याच्या माळी रूममध्ये दारूच्या नशेत मित्राला आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा लोखंडी कुदळीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताचे नाव दिनेश लक्ष्मण गरवड (वय 36, रा. भाजे, ता. मावळ) असे असून, फिर्यादी ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड (वय 40, रा. भाजे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव विश्वजित डेका (वय 18 वर्ष, रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
दिनांक 3 जुलै 2025 रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास कुबेर व्हिला, ठाकूरसाई येथील बंगल्यातील माळी रूममध्ये ही घटना घडली. आरोपी व मयत दोघेही त्या बंगल्यात माळीकाम करत होते. दरम्यान, दारूच्या नशेत मयत दिनेश गरवड याने आरोपी प्रणव डेका याला आईबाबत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून प्रणवने लोखंडी कुदळीने दिनेशच्या डोक्यावर वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी प्रणव डेका याला अटक करण्यात आली असून, घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. या घटनेचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत असून, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ