Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कामशेत घाटात बुधवारी (दि. 2 जुलै) दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पीकअप वाहन चालकावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश जयलाल चौधरी (वय १९, रा. शिवणे, वारजे, पुणे) व प्रज्वल ज्ञानेश्वर सराफ (वय २३, रा. औंध आयटीआय कॉलेज हॉस्टेल, हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी ऋषभ विनोद हिवाळे (वय २३, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रदीप मुकुंदा पाटील (वय ४४, रा. दिघी, पुणे; मूळगाव पिंपळखुटा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) या पीकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मित्र आकाश चौधरी व प्रज्वल सराफ हे दुचाकीवरुन (एमएच १२ – एक्सबी – ००३८) लोणावळ्याकडे जात होते. त्यावेळी पावसामुळे दुचाकी घसरून ती दुभाजकाला आदळली व दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी लोणावळ्याहून भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा पिकअप (एमएच १४ – एलबी ७६२८) वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत या दोघांना चिरडले. गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ