Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आंबी (ता. मावळ) हद्दीतील ओढ्याच्या कडेला अवैधपणे सुरु असलेल्या दारूभट्टीवर मंगळवारी (दि. १ जुलै) रात्री अचानक छापा मारुन तब्बल ७ हजार लिटर गूळ मिश्रित कच्चे रसायन आणि ७० लिटर गावठी हातभट्टी दारू नष्ट केली.
तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अनंत रावण, स्वराज साठे, विनायक शेरमाळे, भीमराव खिलारे, रमेश घुले, दीपाली कुंभार यांच्या पथकाने तळेगाव एमआयडीसी फ्लोरिकल्चरल पार्कच्या पश्चिमेला असलेल्या ओढ्याजवळ ही कारवाई केली.
पोलीस पथक येत असल्याचा सुगावा लागताच अवैध दारूभट्टी चालविणाऱ्या महिला आरोपीने पळ काढला. दरम्यान लोखंडी टाकीत अंदाजे ७ हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याकरीता लागणारे गूळ मिश्रित कच्चे रसायन आणि दोन पांढ-या रंगाच्या कॅन्डमध्ये भरलेली ७० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू पोलिसांना आढळून आली.
पंचनाम्यासाठी नमुने घेतल्यानंतर साडेतीन लाख रुपये किमतीचे कच्चे रसायन, सात हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जमिनीवर ओतून जागेवरच नष्ट केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ