मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचे गुरुवारी (8 डिसेंबर) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ( Maval Vidhansabha Former Mla Digambar Bhegade Passed Away Due To Heart Attack )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिगंबर भेगडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा मनोहर आणि प्रशांत, तीन मुली, पुतण्या तालुका भाजपाचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास…
इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून दिगंबर भेगडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे – जिल्हाध्यक्ष आणि दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. दिगंबर भेगडे हे मावळ विधानसभेतून भाजपाच्या तिकिटावर 19999 आणि 2004 च्या सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. विठ्ठलाचा वारकरी ते विधानसभेचा मानकरी अशी बिरुदावली त्यांच्याबाबत वापरली जात होती. ( Maval Vidhansabha Former Mla Digambar Bhegade Passed Away Due To Heart Attack )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र पोलिस भरतीबाबत मोठी बातमी! आता तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत स्थान मिळणार?
– ग्रामपंचायत निवडणूक 2022 : शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध, सरपंचपदासह सर्व सदस्य बिनविरोध