Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील तलाव परिसरात रविवारी (दि. २० जुलै) सायंकाळी ५ वाजता विशेष निसर्ग निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अर्थ वॉच’ आणि ‘वन्यजीव रक्षक मावळ’ या संस्थांच्या विद्यमाने ‘कोळी निरीक्षण फेरफटका’ व ‘पतंग सप्ताह उत्सव’ साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी निसर्गप्रेमींना कोळ्यांचे आणि पतंगांचे जीवनचक्र, त्यांच्या सवयी, व पर्यावरणातील महत्त्व याविषयी कीटक व वन्यजीव तज्ज्ञ प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम मोफत असून सर्व वयोगटांसाठी खुला आहे.
या उपक्रमाचा उद्देश जैवविविधतेचे महत्त्व समजावून देणे, निसर्गाशी जवळीक वाढवणे आणि जनजागृती घडवून आणणे असा आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी