Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा (डीपी) उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील शेतकऱ्यांनी उर्से टोलनाका येथे एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत दोन्ही बाजूंनी तीस मीटर रुंदीचा सेवा रस्ता करण्याचा प्रारुप आराखडा तयार केला होता. यामुळे गहुंजे ते लोणावळा मार्गालगत शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित होऊन अनेकजन भूमिहीन होणार होते.
यापूर्वीही शेतकऱ्यांनी द्रुतगती मार्ग, पवना, मळवंडी, आढले, पुसाणे, कासारसाई आदी धरणांसाठी, क्रिकेट स्टेडियम, एमआयडीसीसाठी जमिनी दिल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन अजूनही झालेले नसताना आणखी जमिनी संपादित करण्याचा घाट या आराखड्याद्वारे घालण्यात आला होता.
रस्त्या रुंदीकरणात जमीन जाऊन शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मावळ तालुका शेतकरी कृती समिती, भाजप किसान मोर्चा मावळ तालुका, शेतकरी यांच्या वतीने प्रकल्पास विरोध करत अनेक वेळा निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती. तसेच माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्यासह नऊ जणांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, जमीन हक्क परिषेदेचे अध्यक्ष माउली सोनवणे, दिनकर शेटे, गुलाबराव घारे, बाळासाहेब कारके, संदीप आंबेकर, जालिंदर सावंत, विकास धामणकर, करण कंधारे यांच्यासह शेतकऱ्यांनी द्रुतगती मार्गालगतच्या उर्से टोलनाका येथे आनंदोत्सव साजरा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी