Dainik Maval News : अपघातात शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासत असते. अशावेळी रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जीव धोक्यात येतात. या सामाजिक भावनेतून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ आणि पुणे-पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कै. दुर्गसेवक राज बलशेटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कामशेत येथील रिंकू बालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाराष्ट्र बँक समोर रविवार, दिनांक २७जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष सचिनराव शेडगे यांनी दिली आहे.
या वर्षाच्या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान प्रमाणपत्र, ब्लड रिपोर्ट, हिमोग्लोबिन आणि रक्त तपासणी तसेच अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.
यासह भविष्यात रक्तदात्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची हमी ही सह्याद्री प्रतिष्ठान मावळ त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा