Dainik Maval News : नाणे मावळ विभागातील कांब्रे – कोंडिवडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी शेतकरी कुटुंबातील पिंकी हेमंत राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच सीमा गायकवाड यांचा ठरविलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी विशेष निवड सभा पार पडली. यावेळी निवड प्रकियेत पिंकी हेमंत राऊत यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी स्वाती शिंदे आणि तलाठी योगिता कदम, ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर होतात पिंकी हेमंत राऊत यांच्या समर्थकांनी फटाके वाजवित व गुलाल उधळत आपला आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच पिंकी राऊत म्हणाल्या की, गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
या वेळी ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब, माजी सरपंच स्वामी गायकवाड, सुवर्णा गायकवाड, कविता बाबाजी गायकवाड, किरण लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब पहाड, उपसरपंच मारुती गायकवाड आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्राम सदस्य आणि कांब्रे कोडिवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा