Dainik Maval News : सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रक्रियांना गती देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रलंबित असलेल्या नोंदींचा डेटा थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून पाहता येणार असून, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची थेट नजर राहणार आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर मापारी म्हणाले, “सात-बारा उताऱ्यातील प्रलंबित असलेल्या विविध नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रलंबित असलेल्या नोंदींबाबत संपर्क साधला जाईल.”
फेरफार नोंदी, खरेदी-विक्री, वारस नोंदी यांसारख्या अनेक प्रकरणांत अनेक महिन्यांपासून प्रलंबित नोंदींमुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मापारी यांनी फेरफार प्रकरणांच्या नियमित समिकरणासाठी विशेष मोहीम राबवली आहे.
सदर मोहिमेमुळे मावळातील अनेक नोंदींना वेग मिळणार असून ग्रामस्थांची प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे महसूलचा कारभार पारदर्शक होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा ! तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर राबविणार अभियान
– ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल ! महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी उभारणार ‘उमेद मॉल’
– अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता
– पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News