Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आमसभा आयोजित करावी, अशी मागणी मावळ तालुका शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, युवा सेना अध्यक्ष राजेश वाघोले, विशाल हुलावळे, मदन शेडगे, चंद्रकांत भोते, राम सावंत, सोमनाथ कोंडे, सहादू बढेकर, नवनाथ हरपुडे आदींनी याबाबत नायब तहसीलदार गणेश तळेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले आहे.
आमसभा म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडण्याचे एक माध्यम आहे. शासकीय खाते प्रमुखांसमोर प्रश्न मांडून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाते.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदींच्या उपस्थितीत ही सभा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न