Dainik Maval News : देहू नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग लाभ योजनेच्या पाच टक्के निधीतून हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना १५ ऑगस्ट रोजी सहा हजार दोनशे पन्नास रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. तसेच दुसरा हप्ता लवकरच देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग विभाग प्रमुख रामदास भांगे यांनी दिली.
देहू व पिंपरी-चिंचवड शहर प्रहार संघटनेच्या वतीने नुकतीच दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम, लेखापाल केशव पिनाटे, लेखापरीक्षा धनंजय नाईकवाडे, पिंपरी-चिंचवड प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, संजू डोईफोडे, बाळासाहेब डोके व इतर उपस्थित होते.
देहू नगरपंचायत हद्दीत १०३ दिव्यांगांची नोंद आहे. नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांगांच्या पाल्यांना पहिली ते दहावी दरम्यान शैक्षणिक अनुदान देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे दिव्यांग भवन उपलब्ध व्हावे, विविध शासकीय व निमशासकीय ठिकाणी मंदिर, मोफत दाखले मिळावे, व दिव्यांग कल्याण समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे भांगे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या